"जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र"

(सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार)

(कार्यान्वयन संस्था : रा स्व संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत)



जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ऑनलाईन नोंदणीची उद्दिष्टे
  • जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी १००% करून ती संकेतस्थळावर online उपलब्ध करणे.
  • अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देणे.
  • तपासणी पश्चात पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनाद्वारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
  • दिव्यांगांसाठी उपकरणे आवश्यक असल्यास उपलब्ध करून देणे. (उदा.५% अपंग निधी, इतर शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था, CSR इ.)
  • प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणे. (उदा. ५% खर्च योजना, विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, पेन्शन योजना, एसटी / रेल्वे पास, इतर शासकीय लाभ इ.)
  • सर्व पात्र दिव्यांग लाभार्थींना 'स्वावलंबन कार्ड' उपलब्ध करून देणे.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ऑनलाईन नोंदणीचा उद्देश
  • या अभियानांतर्गत जिल्यातील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे,
  • दिव्यांगांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे,
  • विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि आरोग्य विषयक संदर्भ सेवा उपलब्ध करून देऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

नमस्कार मित्रहो ! जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, मुंबई उपनगर आणि अलिम्को यांच्या संयुक्त प्रयत्नाने दिव्यांगांना उपयुक्त अशा विविध उपकरणांचे / कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यासाठी आवश्यक तपासणी चाचण्या करून उपकरणांचे लाभार्थी ठरविण्यासाठी एक शिबीर दि ८, ९ १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी – १०ः०० ते सायं ५ः०० वाजेपर्यंत नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र, जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग, स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला, अंधेरी (पश्चिम), ओशिवरा लोअर मेट्रो स्टेशन जवळ, हायलॅंड पार्क समोर, मुंबई – 400053 येथे आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरातील लाभार्थ्यांना बी पी सी एल, मुंबई रीफायनरीच्या सी एस आर अंतर्गत उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सदरहू शिबीरात दिव्यांगांसाठी निरामय आरोग्य विमा योजना अर्ज, UDID card करिता नोंदणी इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, तरी मुंबई व परीसरातील सर्व दिव्यांग बंधु भगिनी यांना विनंती करण्यात येते की, आपण वरील शिबीराचा लाभ घ्यावा, तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सदरहू मेसेज आपल्या परीचयातील दिव्यांग व या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांबरोबर जरूर शेअर करावा ही विनंती.
शिबीरामध्ये तपासणी करण्यात येवून नंतर वितरीत करण्यात येणारी साधने – व्हील चेअर, ट्राय साईकल, मोटाराईज्ड ट्राईसायकल, स्मार्ट फोन, रोलेटर, सी पी चेअर, कुबड्या इत्यादी
शिबीराकरिता आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. यु डी आय डी कार्ड
3. रेशन कार्ड / उत्पन्नाचे प्रमाणपत्र
टिप – ज्या लाभार्थ्यांनी यापुर्वी अलीमको किंवा सरकारी योजनेमध्ये साहित्य घेतले असेल तर तपासणीला येवू नये. अधिक माहितीसाठी संपर्क - +917262036726

Important News

Hello friends ! With the joint efforts of District Disability Rehabilitation Center, Mumbai Suburb and ALIMCO, a camp is being organized on 8th, 9th and 10th January 2025 from 10:00 AM to 5:00 PM at the Urban Health Training Center, Department of Janaaushadha Vaidyak Shastra Division (Mass Medicine Medical Science Division), Swami Samarth Nagar, Lokhandwala, Andheri (West), Near Oshiwara Lower Metro Station, Opposite Highland Park, Mumbai – 400053 to make assessment by conducting necessary tests of divyang individuals for distribution of various equipment / artificial materials useful for the divyang. The shortlisted, eligible beneficiaries of this camp will be distributed necessary devices/equipment free of cost under the CSR scheme of BPCL, Mumbai Refinery. In addition to this, activities like Niramaya Health Insurance Scheme Application, registration for UDID card etc. will be undertaken in this camp for the divyang. Therefore, all the divyang brothers and sisters in Mumbai and surrounding areas are requested to participate in this activity and take advantage of the above camp. All the readers of this message are hereby requested to share this message with the divyang citizens connected with them, and also with organizations working for this cause.
Following devices/equipment will be distributed to the divyang shortlisted during this camp – Wheel chair, tricycle, motorized tricycle, smart phone, rollator, CP chair, crutches etc.
Documents required for the Camp
1. Aadhaar card
2. UDID card
3. Ration card / Income certificate
Please note that– Those who have already been allotted devices/equipment as beneficiaries under ALIMCO or any other Government scheme are not eligible to take benefit of this camp. For more information, please contact - +917262036726


नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग ऑनलाईन नोंदणी उपक्रम राबविण्याचे निश्चित झाले आहे.